Hadapsar Pune Crime News | बिटक्वाईन ट्रेडिंगच्या नावाने महिला डॉक्टराला 15 लाखांना गंडा

Fraud

पुणे : Hadapsar Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment In Share Market) केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या गुंतवणुक कंपन्यांच्या नावाने ऑनलाईन गंडा घालण्याचा सायबर क्राईम (Pune Cyber Crime News) वाढले असताना आता बिट क्वाईनमध्ये ट्रेडिंग (Bitcoin Trading) करण्याच्या नावाखाली गंडा घालण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यात महिला डॉक्टरला १५ लाख १३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Online Cheating Fraud Case)

याबाबत एका ३४ वर्षाच्या महिला डॉक्टरने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खासगी डॉक्टर असून त्यांनी एका टेलिग्राम युझरने लिंक पाठवून एका वेबसाईटवर बिट क्वाईनचे ट्रेउिंग खाते रजिस्टर करुन आम्ही सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग केल्यास डायरेक्ट प्रॉफिट मिळेल, असे आमिष दाखविले.

त्याने सांगितल्या प्रमाणे त्यांनी वेळोवेळी १० लाख ७६ हजार ४०० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांना टेलिग्राम युजरने अ‍ॅमेझोन मॉल टास्क या ग्रुपमध्ये अ‍ॅड केले. व्हरच्युअल ग्रोसरी खरेदी करण्याचे टास्क असतील व त्याचे कमिशन मिळेल, असे सांगितले. त्यांनी पहिला टास्क पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यावर ६६५० रुपये आल्याचे दिसले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सुरुवातीला छोट्या रक्कमा ट्रान्सफर केल्या. त्यावर कमिशन मिळाल्याने, त्यांनी आणखी रक्कमा ट्रान्सफर केल्या.

अशा प्रकारे त्यांनी ४ लाख ३६ हजार ६७२ रुपये ट्रान्सफर केले होते. त्यांच्या ट्रान्सफर केलेल्या रक्कमेवर १ लाख १३ हजार ७७८ रुपयांचा प्रॉफिट दिसत होता. त्यानंतर त्यांनी पैसे विड्रॉल करीता रिक्वेस्ट पाठविली असता त्यांचे खाते फ्रीज झाले असल्याचे नोटिफिकेशन आले. त्याबाबत त्यांनी टेलेग्राम युजरला विचारल्यावर त्याने तुमचे राहिलेले टास्क पूर्ण करावे लागतील. त्या करीता तुम्हाला ९० हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. तेव्हा त्यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन
केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

You may have missed