Hadapsar Pune Crime News | सीमकार्ड 5G केले नाही तर कार्ड बंद होण्याची भिती दाखवून फसवणूक; सायबर चोरट्यांचा नवा फंडा, असे गुन्हे वाढण्याची शक्यता

sim card

पुणे : Hadapsar Pune Crime News | बँक व्हेरिफिकेशन (Bank Verification) न केल्यास तुमचे खाते ब्लॉक होईल, असे सांगून सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) लोकांच्या फसवणूकीला सुरुवात केली. त्यानंतर तुमचे वीज कनेक्शन तोडले जाईल, असे मेसेज पाठवून लोकांना जाळ्यात पकडून फसविण्यास सुरुवात केली. त्यानंतर ज्या भागात पाईप गॅस लाईन पोहचली आहे, अशा लोकांना तुमचे गॅस कनेक्शन बंद केले जाईल, अशी भिती दाखवून सायबर चोरट्यांनी लुबाडण्यास सुरुवात केली. त्याच्या पुढे आता सायबर चोरट्यांनी सीम कार्ड ४ जी आहे ते ५ जी केले नाही तर तुमचे सीम कार्ड बंद होईल, अशी भिती दाखवून कर्न्व्हट करण्याच्या नावाखाली ई सीम सुरु केले. मोबाईलचा अ‍ॅक्सेस स्वत:कडे घेऊन लोकांची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याचा नवा फंडा सुरु केला आहे. (Cyber Thieves)

याबाबत हडपसर येथील एका ५५ वर्षाच्या नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांच्या मोबाईलवर सोहितकुमार या नावाने तुमचे जीओ सीम कार्ड ४ जी आहे़ ते ५ जी केले नाही तर तुमचे सीम कार्ड बंद होईल, असा फोन आला. त्यांनी सीमकार्ड कनव्ह्रट करायचे नाही असे सांगितले. परंतु ते वारंवार फोन करत होते. त्यांनंतर त्यांच्या सीमकार्ड बंद पडले. तेव्हा त्यांनी जीओ १९९ टोल फ्री नंबरला कॉल केला. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांचे नाव पत्ता व शेवटचा रिचार्ज केव्हा केला व व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्डचे शेवटचे चार अंक विचारले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी माहिती सांगितली.

त्यानंतर त्यांचे नियमित चालु असलेले सीम कार्ड बंद होऊन ई सीम चालु झाल्याबाबत मेसेज आला. परंतु, थोड्या वेळाने सीम कार्ड चालु न झाल्याने परत फोन करुन विचारले. त्यांनी फिर्यादी यांचे आधार कार्ड ब्लॉक झालेबाबत सांगितले. आधार कार्ड अनब्लॉक करण्यासाठी ते आधार केंद्राला गेले. परंतु आधार केंद्राला सुट्ट्या असल्यामुळे आधार सेंटर बंद होते. (Online Cheating Case)

२४ ऑक्टोबर रोजी यांचे सीम कार्ड बंद पडले होते. त्यानंतर त्यांनी ४ नोव्हेबर रोजी गुगल पे ओपन करुन बॅलन्स चेक केले असता त्यांच्या महाराष्ट्र बँकेतील खात्यातून २५ ऑक्टोबरपासून ४ नोव्हेंबरपर्यंत तब्बल ४० व्यवहारातून ९ लाख २१ हजार ११२ रुपये काढले गेल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ९ व्यवहारातून ५८ हजार ३९९ रुपये काढले गेले होते. फिर्यादी यांचे ई सीम कार्ड एक्टीव्हेट करुन चोरट्याने मोबाईलचा अ‍ॅक्सेस स्वत:कडे घेतला. त्यामुळे आपल्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचे फिर्यादी यांना समजलेच नाही. त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून ४९ व्यवहार होऊन ते पैसे वेगवेगळ्या ४८ खात्यात टान्सफर करण्यात आले आहेत. त्यांची एकूण ९ लाख ७९ हजार ५११ रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत. (Hadapsar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed