Hadapsar Pune Crime News | हडपसर : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने दोघांना भर दिवसा बेदम मारहाण

marhan

पुणे : Hadapsar Pune Crime News | दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांनी दोघा तरुणांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (Bedum Marhan) केली. या मारहाणीत त्यांचे मनगटाचे हाड व पायाच्या घोट्याचे हाड फॅक्चर झाले आहे. (Hadapsar Pune Crime News)

याबाबत सनी अशोक ढेकणे (वय ३४, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत राखपसरे, रोहन पाथरकर, आदित्य राखपसरे याचा मित्र अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मांजरीतील वसंतदादा शुगर येथील एच डी एफ सी बँक चार वाडा येथे २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र दादा थोरात हे चारवाडा येथून कॅप्टन वस्तीमार्र्गे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जात होते. त्यांच्या ओळखीचे आरोपींनी त्यांना अडविले. ते दारु पिलेले होते. तरीही त्यांनी या दोघांकडे आणखी दारु पिण्यासाठी पैसे दे अशी मागणी केली. त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अनिकेत याने आपल्या भावाला बोलावून घेतले. त्यांचा भाऊ अदित्य व त्याचा मित्र आले.

त्यांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी दोघांना मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादी यांच्या उजव्या हाताचे मनगटाचे हाड व डाव्या पायाचे घोट्याचे हाड फॅक्चर झाले आहे.
त्यांनी उपचार घेतल्यानंतर फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण