Hadapsar Pune Crime News | पोलिसांना कामाला लावून तो खात बसला होता निवांत डबा ! मतदान सुरु असताना तरुणाचे अपहरण झाल्याची तक्रार, पकडल्यानंतर खरा प्रकार आला समोर
पुणे : Hadapsar Pune Crime News | शहरात सर्वत्र मतदान सुरु होते़ पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. तशात तीन चार मुलांनी एका तरुणाचे हातपाय बांधून अपहरण (Kidnapping Case) केल्याची तक्रार येते. अगोदरच अर्लट असलेली पोलीस यंत्रणा आणखी सजग होते. अपहरण झालेल्या तरुणाला शोध घेतला असता तो एका झाडाखाली चक्क डबा खात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर खरा प्रकार समोर आला.
याप्रकरणी एका ६१ वर्षाच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. ते घरी असताना त्यांच्या ४३ वर्षाच्या मुलाच्या मोबाईलवरुन फिर्यादीच्या मोठा मुलगा याला त्याच्या मोबाईलवर फोन आला. त्याला तीन चार अनोळखी मुलांनी पकडून त्याचे हात पाय बांधून घेऊन निघाले आहेत, असे कळविले असून या लोकांनी मुलाचे अपहरण केल्याचे सांगितले. या तक्रारीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाला सुरुवात केली.
मुलाच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यात आले. ते लोहगाव परिसरात निघाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे (PI Santosh Pandhare) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी व त्यांच्या सहकार्यांचे पथक लोहगाव परिसरात शोध घेऊ लागले. तेथील एका झाडाखाली हा तरुण चक्क एकटाच डबा खात बसल्याचे दिसून आले. डबा खाता खाता तो जंगली रम्मी खेळत होता. हे सर्व पाहून पोलिसांना उलघडा झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
हा ४३ वर्षाचा तरुण बी जे शिर्के कंपनीत अँगल कटिंगचे काम करतो. त्याला काही महिन्यांपासून जंगली रम्मी खेळण्याचा नाद लागला आहे. त्यासाठी त्याने मित्र, नातेवाईकांकडून थोडे थोडे करीत साडेतीन लाख रुपये उसने घेतले. आता हे लोक पैसे परत मागण्यासाठी घरी येऊ लागले. त्यातून वाद सुरु झाले. तेव्हा त्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने अपहरण झाल्याचा बनाव रचला व मोठ्या भावाला फोन केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करीत आहेत. (Hadapsar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pashan Pune Crime News | मनी लॉड्रिंगच्या नावाने आय टी इंजिनिअरची 6 कोटी 29 लाख रुपयांची
फसवणूक; डिजिटल अरेस्ट करुन सीबीआयच्या नावाने घातला गंडा
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित
राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी
‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट