Hadapsar Pune Crime news | नशा करण्यासाठी वापरले जाणाऱ्या मॅफेनटरमाईन इन्जेक्शनची बेकायदा विक्री करणारा जाळ्यात; तब्बल ३९ बाटल्या सापडल्या

Mephentermine Sulphate Injection

पुणे : Hadapsar Pune Crime news | रक्तदाब कमी झाल्यावर घेतले जाणार्‍या मॅफेनटरमाईन सल्फेट या इन्जेक्शनचा (Mephentermine Sulphate Injection) नशा करण्यासाठी वापर करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या इन्जेक्शनचा साठा करुन त्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍यास हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) पकडले आहे.

https://www.instagram.com/p/DAINwPCprDz

ओंकार अंगद बिनवडे Omkar Angad Binawade (वय २१, रा. प्रगतीनगर, काळेपडळ रोड, हडपसर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे मॅफेनटरमाईन सल्फेट हे इन्जेक्शनच्या ३९ बाटल्या आढळून आल्या आहेत.

https://www.instagram.com/p/DAGgS5oJ9rK

ओंकार बिनवडे हा हे इन्जेक्शन ६०० ते ७०० रुपयांना विक्री करत होता. बाजारभावानुसार त्यांच्याकडे २५ हजार रुपयांचा माल आढळून आला.

https://www.instagram.com/p/DAGiBBHJo6Y

हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे (API Arjun Kudale) यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे (PSI Mahesh Kavle), पोलीस अंमलदार दीपक कांबळे, निलेश किरवे, अभिजित राऊत यांनी कारवाई करुन ओंकार बिनवडे याला पकडले.

https://www.instagram.com/p/DAGmGj2CHED

आरोपी ओंकर बिनवडे याच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना तसेच त्याने औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणार्‍या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते, हे माहिती असताना सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या विक्रीकरीता ते बाळगले असल्याचे दिसून आले आहे.

https://www.instagram.com/p/DAGcj3DCHPH

ही कारवाई पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे (Sr PI Santosh Pandhare), पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे (PI Nilesh Jagdale) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दीपक कांबळे, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली आहे. (Hadapsar Pune Crime news)

https://www.instagram.com/p/DAGYk9BpBim

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | सराईत वाहनचोराकडून ६ मोटारसायकली हस्तगत ! भोसरी, चाकण, चिंचवड, शिर्डी, सोलापूर येथे केल्या होत्या चोर्‍या (Video)

Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!

MCOCA Action On Enjoy Group | जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर मोक्का कारवाई (Video)

You may have missed