Hadapsar Pune Crime News | 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून लुबाडले सव्वातीन लाख रुपये

Woman

पुणे : Hadapsar Pune Crime News | १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २२ हजार रुपये लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) ज्योती धनाजी खंकाळ (वय ३८, रा. ढेरे बंगला, मांजरी) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत घुले कॉलनीतील एका ४३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ सप्टेबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षाची मुलगी दहावीला शिकत आहे. आरोपी महिलेची मुलगीही तिच्या बरोबर असते. फिर्यादीचे पती व्यावसायिक असल्याने त्यांच्या घरात रोकड असते. फिर्यादी या पतीसह गावी गेल्या होत्या. त्यांच्या घरासमोर ज्योती खंकाळ या राहतात. त्यांच्या दोन्ही मुलीची मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांची इन्स्टाग्राम सेलेब्रिटी फेस या आय डीवरुन उमा नावाच्या महिलेशी ओळख झाली. ती त्यांना चित्रपटात काम देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ज्योती हिने फिर्यादी यांच्या मुलीला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देणार असल्याचे सांगितले.

ज्योती हिने या मुलीशी गोड बोलून घरात असलेले भिशीचे १ लाख ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर वारंवार तिच्याकडून ५ हजार, ४ हजार रुपये असे ४२ हजार रुपये फोन पेद्वारे घेतले. त्यानंतर घरातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व २ ग्रॅमची सोन्याची अंगठी घेऊन गेले. फिर्यादी या २० ऑक्टोबर रोजी घरी परत आल्या. तेव्हा घरामध्ये ठेवलेले पैसे व सोने पाहिले असता ते मिळून आले नाही. त्यांनी मुलीकडे चौकशी केल्यावर तिने आपल्याला ज्योती खंकाळ हिने कसे फसविले, याची माहिती दिली. ज्योती हिने २ लाख ६२ हजार रुपये रोख व ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंकेंकडून अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांनी घड्याळ सोडत हाती घेतली तुतारी

Raj Thackeray On Eknath Shinde-Ajit Pawar | ‘पक्षाचे नाव व चिन्ह घेणं योग्य नाही’, सत्तासंघर्षांवरून राज ठाकरेंचा शिंदेंसह अजित पवारांना टोला; म्हणाले…

Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत

Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा