Hadapsar Pune Crime News | गोंधळ घालू नका, सांगितल्याने दारुच्या बाटल्या फोडून बारचे केले नुकसान

Hadapsar Police Station

पुणे : Hadapsar Pune Crime News | बारमध्ये दारु पित असताना गोंधळ घालणार्‍यांना अटकाव केल्याने त्यांनी दारुच्या बाटल्या फेकून बारचे नुकसान करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत हडपसर पोलिसांनी कुणाल कैलास खोसे (वय १८, रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) आणि कृष्णा गणपत चव्हाण (वय २५, रा. काळेपडळ, हडपसर) यांना अटक केली आहे. त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंत्री मार्केट येथील कसीनो रेस्टॉरंट अँड बारमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजता घडली. (Hadapsar Police Station)

याबाबत बारचे मॅनेजर कृष्णकुमार सोनके (वय ३५, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कसीनो रेस्टॉरंट अँड बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या बारमध्ये कृष्णा चव्हाण व त्यांच्याबरोबर तिघे जण दारु पिण्यासाठी आले होते. दारु पित असताना ते गोंधळ करीत होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना बारमध्ये गोंधळ करु नका, शांतता राखा, बारमध्ये दुसरेही कस्टमर आहेत, असे सांगितले. त्यावर त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तेव्हा कृष्णा चव्हाण याने त्याला शिवीगाळ करु नको, असे सांगितले. हा प्रकार पाहून मालकाचा मुलगा प्रतिक कांबळे आतमध्ये आला. त्यांनी कृष्णा चव्हाण व त्याच्या मित्रांना तुम्ही शिवीगाळ का करता काय झाले, असे विचारुन त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी कृष्णा चव्हाण याने प्रतिक कांबळे याला तू कोण तुझा काय संबंध असे विचारले.

तेव्हा त्याने मी बारच्या मालकाचा मुलगा असल्याचे सांगितले. तेव्हा त्याचे मित्र फिर्यादी यांना मारण्यासाठी अंगावर धावले. ते टेबलावरच्या बाटल्या उचलून मारहाण करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना बारमधील कामगारांनी बाहेर काढले. त्यांच्यातील एकाने हॉटेलमधल्या कॅरेटमध्ये ठेवलेल्या स्प्राईटच्या काचेच्या बाटल्यांची कॅरेट रोडवर फेकून फोडल्या.
तसेच दुसरा हॉटेलवर बाटल्या फेकून मारत होता.
तो बाटल्या फेकून मारत असताना त्याचा तोल जाऊन खाली पडताना फुटलेल्या बाटलीवर पडून जखमी झाला.
त्यानंतर फिर्यादींनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोघांना पकडून नेले. हवालदार सोनाली कारंडे तपास करीत आहेत. (Hadapsar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed