Hadapsar Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी; वर्षानंतर घेतला बदला

पुणे : Hadapsar Pune Crime News | गेल्या ऑक्टोबर महिन्यात शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन दोघांनी एका तरुणाला मारहाण करुन डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले.
याबाबत गौरव संतोष आडसुळ (वय २०, रा. शिवचैतन्य कॉलनी, शेवाळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माणिक ऊर्फ बबल्या नागेश सगर (रा. काळेपडळ) आणि रवी चोरले (रा. फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शेवाळवाडी फाट्याजवळील रोडवर शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजता घडला. (Attempt To Murder)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये फिर्यादी यांनी त्यांना शिवीगाळ केली होती. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी रात्री फिर्यादी हे पिझ्झा खावून घरी जात होते. यावेळी शेवाळवाडी फाट्याजवळ दोघा आरोपींनी फिर्यादी यांना अडवले. गेल्या ऑक्टोबरमध्ये आम्हास का शिवीगाळ केली होती, या कारणावरुन त्या दोघांनी मिळून शिवीगाळ व दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माणिक याने जमिनीवर पडलेला दगड उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग