Hadapsar Pune Crime News | वाहतूक कोंडी करणार्‍यास थांबविल्याने पोलिसास मारहाण; कारचालकाला अटक, हांडेवाडी चौकातील घटना

police bhai

पुणे : Hadapsar Pune Crime News | वाहतूक कोंडी सोडवत (Traffic Jam In Pune) असताना अचानक कार पुढे घुसवून आणखी कोंडी करणार्‍या कारचालकाला वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) थांबले. त्याचा राग येथून कारचालक व इतरांनी पोलिसाला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) कारचालकाला अटक केली असून इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वाहतूक पोलीस शिपाई अजिंक्य चंद्रकांत नानगुडे (वय ३४) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मारुती राजाराम माने Maruti Rajaram Mane (वय २२, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे अटक केलेल्या कारचालकाचे नाव आहे. दुचाकीस्वार सोनू पाटकर (वय २४, रा. उंड्री) व एका कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हांडेवाडी चौकात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हांडेवाडी चौकात वाहतूकीचे नियमन करीत होते. त्यावेळी एका कारचालकाने अचानक ट्रॅफिकमध्ये कार घुसवून ट्रॅफिक जॅम केले. त्यामुळे फिर्यादी यांनी चालकास थांबण्याबाबत हाताने इशारा केला. तेव्हा त्या कारचालक मारुती माने याने पोलिसांना शिवीगाळ केली. तेव्हा त्याची गाडी बंद करण्यासाठी चावी काढत असताना त्याने फिर्यादी यांच्या हातावर लोखंडी वस्तूने मारहाण केली.
त्यांच्या पोटात लाथ मारली. तसेच त्याच्याबरोबर असलेल्याने शिवीगाळ केली.
मारुती इंटिंगाचालक व सोनु पाटकर यांच्या वाहनांवर पावती केल्याच्या रागातून त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत. (Hadapsar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed