Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

FIR

पुणे : Hadapsar Pune Crime News | अल्पवयीन मुलांनी टेलिग्रॅम बॉट या अ‍ॅपद्वारे एका नामांकित शाळेतील तीन मुलींचे नग्न फोटो (Nude Photos) तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल (Viral On Social Media) केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार १६ जून ते ३० जून २०२४ दरम्यान घडला होता. (Hadapsar Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी शाळेत शिकत आहे. एका १६ वर्षाच्या मुलाने त्याच्या मोबाईलमधील टेलिग्रॅम बॉट या अ‍ॅपद्वारे फिर्यादी यांची मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी यांचे नग्न फोटो तयार केले. ते इतर दोघा अल्पवयीन मुलांच्या इन्स्टाग्रामवर पाठविले. त्यामधील एका फोटो या तिसर्‍या मुलाने त्याच्या मित्राला इन्स्टाग्रामवर पाठविला. तो व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. पोलिसांनी विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल करुन तिघा मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Flyover | अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’

Hadapsar Pune News | हडपसर: बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन !

Pune ACB Trap Case | महिला सहायक सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; जप्त कार परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Sri Sri Ravi Shankar | वैचारिक अभिव्यक्ती आणि विविधता हेच भारताला भारत बनवते ! – गुरुदेव श्री श्री रविशंकर