Hadapsar Pune Crime News | तडीपार भावाने बहिणीवर उगारला कोयता; लोकांमध्ये दहशत माजविणारा गुंड जेरबंद

women marhan

पुणे : Hadapsar Pune Crime News | तडीपारीविरोधात वकिलाची व्यवस्था करणार्‍या नकार देणार्‍या बहिणीवर तडीपार भावाने मारण्यासाठी कोयता उगारुन धावला. परिसरात दहशत माजविणार्‍या या गुंडाला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

रवि मारुती चक्के Ravi Maruti Chakke (वय ३२, रा. साडेसतरा नळी, हडपसर) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. याबाबत त्याच्या ३२ वर्षाच्या बहिणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त आर राजा (R. Raja DCP) यांनी रवि चक्के याला १२ ऑगस्ट २०२४ रोजी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. या तडीपारीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी वकिलाची व्यवस्था करण्यास रवि चक्के याने बहिणीला सांगितले होते. (Pune Police Tadipari Action)

परंतु, तिने त्यास नकार कळविला होता. त्याचा राग मनात धरुन सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता तडीपारीचा भंग करुन रवि चक्के हा साडेसतरा नळी येथील घरी आला. फिर्यादी बहिणीला शिवीगाळ करुन तिला मारण्यासाठी कोयता घेऊन तिच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी फिर्यादी या घाबरुन पळून गेल्या. तेव्हा फिर्यादी व तिच्या घरच्या लोकांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. घराबाहेर येऊन हातातील कोयता हवेत फिरवून आजुबाजुच्या लोकांकडे पाहून मी इथला दादा आहे, जर कोणी माझ्या आडवे आले तर एक एकाला बघुन घेतो, असे जोरजोरात ओरडत होता. पोलिसांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन रवि चक्के याला ताब्यात घेतले. पोलीस हवालदार गायकवाड तपास करीत आहेत. (Hadapsar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत

You may have missed