Hadapsar Pune Crime News | तरुणाने डोक्यात गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न; हडपसरमधील घटना
पुणे : Hadapsar Pune Crime News | २१ वर्षाच्या तरुणाने गावठी पिस्तुलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला (Attempt To Suicide). विवेक वसंत कोकाटे Vivek Vasant Kokate ( वय २१, रा. गोवर्धन बिल्डिंग, औदुंबर पार्क गोपाळपट्टी) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना त्याच्या राहत्या घरी शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली. त्याच्यावर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये (Noble Hospital Pune) उपचार करण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक कोकाटे हा घरात असताना त्याने गावठी पिस्तुलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळीचा आवाज ऐकून त्याची आई विद्या कोकाटे यांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Hadapsar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण