Hadapsar Pune Crime News | वडा पाव पडला 5 लाखांना ! पैसे खाली पडल्याचे सांगून दागिन्यांची पिशवी पळविली

Theft Case Hadapsar

पुणे : Hadapsar Pune Crime News | दागिने सोडवून घेऊन घरी जात असताना वाटेत वडा पाव खाण्याची इच्छा झाली. पत्नीला दुचाकीजवळ थांबवून ते वडा पाव आणायला गेले. इकडे चोरट्यांनी पैसे खाली पडल्याचा बहाणा करुन पाच लाख रुपयांचे दागिने असलेली दुचाकीवरील पिशवी चोरुन नेली. (Theft Case)

याबाबत दशरथ धामणे (वय ६९, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना शेवाळवाडी येथील रोहित वडेवाले यांच्या दुकानासमोर गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी सेवानिवृत्त आहेत. त्यांनी ऊरुळी कांचन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे तारण म्हणून ४ लाख ९५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. गुरुवारी त्यांनी ते दागिने सोडवून आणले. दागिन्यांची पिशवी त्यांनी दुचाकीला लावली होती. वाटेत रोहित वडेवाले या दुकानासमोर त्यांनी गाडी उभी केली. पत्नीला तेथेच थांबायला सांगून ते वडापाव घेण्यासाठी दुकानात गेले. इतक्यात त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांपैकी एक जण मोटारसायकलवर आला. त्याने त्यांच्या पत्नीला पैसे खाली पडले असल्याचे सांगितले. ते पाहून त्यांची पत्नी पैसे घेण्यासाठी दुचाकीच्या मागच्या बाजूला गेल्या. ही संधी साधून दुसर्‍या चोरट्याने दुचाकीला लावलेली दागिन्यांची पिशवी चोरुन नेली. पोलीस नाईक पांडुळे तपास करीत आहेत. (Hadapsar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chhatrapati Shambhu Raje Rajyabhishek Trust | प्रसिध्दीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मिता जपावी; छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टची मागणी

Catalyst Foundation Pune | डीजे, लेझर लाईट वापरणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करा; सुनील माने यांचे सह पोलीस आयुक्तांना निवेदन

Parvati Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार पाठलाग करुन रिक्षाचालकाने केला विनयभंग

Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण