Hajj Yatra 2026 | हजयात्रेला जाणार्‍या भाविकांचे महापालिकेकडून लसीकरण; सोनावणे हॉस्पिटलमध्ये विशेष आरोग्य शिबीर संपन्न

Hajj Yatra 2026 | Municipal Corporation vaccinates pilgrims going for Hajj; Special health camp held at Sonawane Hospital

पुणे : (हाजी बासित शेख) – Hajj Yatra 2026 | पुणे शहर व जिल्ह्यातून हज यात्रेला जाणार्‍या १०६८ भाविकांचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने खिदमत हज कमेटी व खुद्दाम ए हुज्जाज हज कमिटीच्या वतीने लसीकरण करण्यात आले.  या लसीकरणामुळे हज यात्रेला जाण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या आरोग्य तपासणीचा महत्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला.

सोनावणे हॉस्पिटल येथे रविवारी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सहायक आरोग्य अधिकारी राजेश दिघे, लसीकरण वैद्यकीय अधिकारी  डॉ. अरविंद मखर, डॉ. अब्दुलसलाम सुतार, संदेश देशपांडे परिचारिका शुंभागी वाघापुरे, नेहा मुरकुटे, लसिकरण क्षेत्र संनियंत्रक अतुल शिरसाट, तौफिक शेख यांच्यासह १५ डॉक्टर, ३० परिचारिका, १५ सहायक यांच्या सहकार्याने १०६८ जणांची सर्वप्रथम आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना मेंदुज्वर आणि पोलिओची लस देण्यात आली. ६५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या रक्तदाब, मधुमेहाचा आजार आहे, अशांना फ्लुचा अतिरिक्त डोस देण्यात आला.

हज यात्रेला जाणार्‍या सर्व हाजींना आरोग्य तपासणी आणि लसीकरण अत्यावश्यक असते. लसीकरण करण्यात आलेल्यांनाच हज यात्रेसाठी प्रवेश दिला जातो.
आमदार हेमंत रासने, नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी या शिबीराला उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.

यादरम्यान विशेष करून हाजी खालिद अत्तर यांनी हाजींना लस दिल्यावर डेटा अपडेट करण्यासाठी २० लॅपटॉप व इंटरनेटची व सर्व सोयसुविधा करून दिले त्यामुळे डॉक्टर व हाजींना सोयीस्कर झाले.

यावेळी खिदमत हज कमेटीचे अध्यक्ष हाजी बासित शेख, मौलाना रशीद मिफ्ताही, हाजी युसुफ परिहार, हाजी जाहिद शेख,  हाजी सादिक चौधरी, हाजी अरमान तांबोली, हाजी नासिर काजी, हाजी शहीद तांबोळी , वाहिद बियाबानी, शाहरुख सय्यद, अजीम भाई गुडाकू वाला, हाजी अशरफ भाई हाजी इरफान खान, आदिल दिलावर, तसेच खुद्दामे हुज्जाज  कमिटीचे अध्यक्ष हाजी रियाज काझी, सईद खान, महेबुब शेख , सत्तार चाचा, उस्मान शेख,आदि उपस्थित होते.

You may have missed