Harshawardhan Patil | हर्षवर्धन पाटील यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव, प्रवीण मानेंच्या बंडखोरीचा पाटलांना फटका

Harshawardhan Patil

इंदापूर : Harshawardhan Patil | इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या (Indapur Assembly Election 2024) अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Ajit Pawar NCP) विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाचे उमेदवार व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा १९,२८४ मतांनी दणदणीत पराभव करीत विजयाची हॅट्रिक केली.

अत्यंत लक्षवेधी व चुरशीच्या ठरलेल्या इंदापूर विधानसभा निवडणूकी मध्ये दत्तात्रय भरणे यांना जवळपास १ लाख १६ हजार ७४८ जास्त मते मिळाली तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना ९७,६७३ मते मिळाली. तसेच या निवडणुकीत लक्षवेधी ठरलेले अपक्ष उमेदवार प्रवीण माने (Pravin Mane) यांना ३७,८४३ हजार मते मिळाली.त्यामुळे माने यांची उमेदवारी भरणे यांच्या पथ्यावर पडली. तर हर्षवर्धन पाटील यांना माने यांच्या उमेदवारीमुळे मोठा फटका बसला.

सन २०१९ मध्ये भाजपकडून (BJP) विधानसभेची निवडणूक लढविलेल्या पाटील यांचे पराभवानंतर भाजपने पुनर्वसन करून राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद दिले. तसेच, त्यांच्या ताब्यातील दोन सहकारी साखर कारखाने अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचे बोलले जाते.

मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी इंदापूर तालुक्यात दोन सभा घेतल्या होत्या.
मात्र, जनतेने भरणे यांच्या विकासकामांना प्राधान्य देवून तिसऱ्यांदा विजयाची माळ गळ्यात घातली.
प्रवीण माने यांच्या बंडखोरीने भरणे यांचा विजय सोपा झाल्याची तालुक्यात चर्चा आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed