Harshvardhan Patil | भाजप नेते हर्षवर्धन पाटील उद्या शरद पवारांसह एकाच मंचावर; राजकीय समीकरणे बदलणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Harshvardhan-Patil-Sharad-Pawar

इंदापूर: Harshvardhan Patil | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इंदापूर विधानसभा (Indapur Assembly) मतदारसंघातून दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे काहीसे अस्वस्थ आहेत. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांना अपक्ष किंवा तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे.

https://www.instagram.com/p/DAbaFCPJsX8

हर्षवर्धन पाटील यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. मात्र तुतारी की अपक्ष याबाबतचा निर्णय आपण पितृपंधरवडा संपताच घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हा मतदार संघ आपल्याला सुटावा यासाठी वाटही पाहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

https://www.instagram.com/p/DAdXfp-CcAx

इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथे हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. या संवादावेळीच कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी असा नाराही दिला. काही झालं तरी निवडणूक लढा, असा आग्रह यावेळी कार्यकर्ते करत होते. त्याला पाटील यांनीही प्रतिसाद देत निवडणूक लढणार हे निश्चित केले आहे.

https://www.instagram.com/p/DAdVpIrCH93

हर्षवर्धन पाटील म्हणाले, काही लोकांचं म्हणणं आहे तुतारी सोबत चला. काही लोकांचे म्हणणे अपक्ष चला. काही लोकांचं म्हणणं आहे, इंदापूरची जागा आपल्याला सुटली पाहिजे. त्याचा सर्व विचार करून मी पुढील राजकीय निर्णय घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पक्ष बदलाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार माझ्याशी बोलणार होते. पण अद्याप त्यांनी कोणताही संपर्क केला नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

https://www.instagram.com/p/DAdT7L8p7Oj

“दरम्यान माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)
यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्याचे निमंत्रण मला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेले आहे. या निमंत्रणाचा स्वीकार मी केला आहे. त्यामुळे शरद पवारांसोबत (Sharad Pawar) मी एका मंचावरती या कार्यक्रमाला जाणार आहे”, असे सांगत आपली पुढची दिशा काय असेल याचेच संकेत तर पाटील यांनी दिले नाहीत ना, अशी चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे.

https://www.instagram.com/p/DAdNS2hiA32

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)