Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”
इंदापूर : Harshvardhan Patil | इंदापूर मतदारसंघावरून (Indapur Assembly Constituency) महायुतीत रस्सीखेच (Mahayuti Alliance) सुरु आहे. इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) हे विद्यमान आमदार आहेत तर याठिकाणी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटीलही इच्छुक आहेत. मात्र महायुतीत ही जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान वेळप्रसंगी अपक्ष लढण्याची तयारी असल्याचेही बॅनर इंदापूरमध्ये झळकले होते. मात्र आता मागील दोन दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) संपर्कात असल्याची कुजबुज तालुक्यात सुरु आहे. माध्यमांमधून त्याबाबत वार्तांकन केले जात आहे. या चर्चांवर स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी भाष्य केले आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत परंतु सातत्याने इंदापूरचीच चर्चा होते हे गेल्या महिनाभरापासून पाहतोय. लोकांच्या भावना समजून घेतोय. त्या भावना तीव्र आहेत कारण लोकसभा निवडणुका म्हंटलं की आम्ही, आमचे कार्यकर्ते खूप चांगले मात्र एकदा लोकसभा निवडणूक झाली तर आम्ही खूप वाईट असं होतो. हे फक्त एका निवडणुकीत झाले नाही तर ६ निवडणुकांमध्ये झालं आहे.
२०१९ ला आम्ही सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) मदत केली. मात्र तीन महिन्यात पुन्हा विधानसभेला आम्हाला डावललं गेले. आता २०२४ ला ही जागा भाजपाकडे राहील असं वाटलं. त्यात अजित पवार आमच्यासोबत आले. आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला हा त्यांचा अधिकार आहे. कुणाला सोबत घ्यायचे किंवा नाही हे सांगण्याएवढे आपण मोठे नाही. अजितदादा आल्यानंतर ही जागा त्यांना सोडली. पुन्हा आम्ही त्यांचे काम प्रामाणिक केले.
आता विधानसभा आली. त्यामुळे विद्यमान आमदाराला जागा सोडायची अशी चर्चा सुरू झाली. जागा विद्यमान आमदाराला जाईल की आम्हाला सोडली जाईल याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नाही. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मला कुणीही संपर्क साधला नाही. या प्रश्नावर माझ्याशी कुणी बोलले नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. (Maharashtra Assembly Election 2024)
भाजपा नेत्या अंकिता पाटील ठाकरे (Ankita Patil Thackeray) म्हणाल्या, तर गेल्या १० वर्षापासून आमच्या कार्यकर्त्यांवर संघर्षाचा काळ राहिलेला आहे. कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. इंदापूर तालुक्याची ओळख ही भ्रष्ट तालुका अशी झाली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बदल घडवून आणायचा आहे असं जनतेला वाटतं.
अजून जागावाटपाची चर्चा व्हायची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यावर चर्चा होईल.
सध्या कोण कुठून उभा राहणार हे स्पष्ट नाही. जागावाटपाचा निर्णय महायुतीचे सर्व नेते एकत्रित येऊन घेणार आहेत.
त्यामुळे इंदापूरमधून कोण लढेल हे त्यात ठरेल असं विधान भाजपा नेत्या अंकिता पाटील ठाकरे यांनी केले आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, दरम्यान, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा नेता मोठा व्हावा असं वाटत असतं.
हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनाही तेच वाटते. माझ्या कार्यकर्त्यांनाही ते वाटते. कार्यकर्त्यांची भावना काही चुकीची नाही.
जर हर्षवर्धन पाटलांना महायुतीची उमेदवारी मिळाली तरी मी जोमाने काम करणार असं
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे इंदापूर मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. (Harshvardhan Patil)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून
Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”
Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?