Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांच्या विधानाने भरणेंची धाकधूक वाढली; म्हणाले – ‘मला फडणवीस, अजित पवारांनी शब्द दिलाय…’

Harshvardhan Patil

इंदापूर : Harshvardhan Patil | अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते हर्षवर्षन पाटील यांचे राजकीय वैर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीने हर्षवर्धन पाटलांनी बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात तर सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) विजयासाठी प्रचार केला.

मात्र तरीही सुप्रिया सुळे एक लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आल्या. इंदापूरमध्ये सगळे दिग्गज नेते एका बाजूला असतानाही सुनेत्रा पवारांना इंदापूरमधून लीड देता आले नाही. (Harshvardhan Patil)

हा प्रचार करताना इंदापूरची (Indapur Assembly Constituency) जागा हर्षवर्धन पाटलांना सोडली जाणार अशी कुजबुज होती. सध्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा त्यांनाच सुटेल अशीही चर्चा आहे.

मागील दोन विधानसभा निवडणुकीत भरणे विरुद्ध पाटील अशी थेट लढत झाली. दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane)
दोन्ही निवडणुकीत विजयी झाले. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील तयारीला लागले आहेत.
मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.

मात्र लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे असे आज (दि.१२) माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भर भाषणात सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांच्या विधानामुळे इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची धाकधूक वाढणार हे नक्की.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed