Harshvardhan Patil On Ajti Pawar | ‘ते दिवंगत माणसाबद्दल बोलतात; माझ्याबद्दल बोलले त्यात आश्चर्य काय?’, हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांवर निशाणा
बारामती: Harshvardhan Patil On Ajti Pawar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. आज बारामतीत (Baramati Assembly Election 2024) शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ” अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आहेत. केवळ इंदापुरात नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही जाऊन बोलले तर आमच्याबद्दल गौरवोद्गार काढले तर तो त्यांचा अधिकार आहे. दिवंगत माणसाबद्दल ते बोलले त्यामुळे ते माझ्यासारख्या जिवंत माणसाबद्दल बोलले त्यात आश्चर्य नाही”, असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे.
“अजित पवार तयारी करून बोलत नाहीत. त्यांच्याकडे येणाऱ्या चिठ्या चपाट्या येतात त्या बघून ते बोलतात. ते माझ्याविषयी जे काही बोलले त्याला इंदापूर मधील जनता योग्य उत्तर देईल “,असा थेट इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिला आहे.
इंदापूरमधील राजकीय घडामोडीवर पुढे बोलताना ते म्हणाले, ” शरद पवार साहेबांचा आशीर्वाद जांच्या पाठीशी असतो तो उमेदवार विजयी होतो. महाराष्ट्राची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. शरद पवार हे परिवर्तन घडवणार.
इंदापूरमध्ये आप्पासाहेब जगदाळे यांच्याशी पवार साहेबांच बोलणं झालं आहे. त्यांची उमेदवारी बद्दल नाराजी आहे. पवार साहेब ती नाराजी दूर करतील. प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे उमेदवारी माघारी घेतील असा मला विश्वास आहे “, असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा