Harshwardhan Mankar | प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन

Harshwardhan Mankar | Special free health check-up camp inaugurated by Corporator Harshwardhan Mankar on the occasion of Republic Day

पुणे :  Harshwardhan Mankar | २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुणे शहरातील नळ स्टॉप चौक, कर्वे रोड येथील डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नवनियुक्त नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांच्या शुभहस्ते पार पडले.

नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले,नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या लोकहितकारी उपक्रमाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले, याचा मला मनापासून आनंद आहे. या शिबिरामध्ये शुगर तपासणी, दंत तपासणी, वजन मोजणी व रक्तदाब (BP) तपासणी अशा अत्यावश्यक आरोग्य तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत. आरोग्य तपासणीद्वारे आजारांचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार घेणे शक्य होते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेअभावी आरोग्याकडे दुर्लक्ष होते; अशा वेळी हा उपक्रम नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असून त्याची नितांत गरज असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. डायग्नोस्टिक सेंटरतर्फे सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवण्यात आला असून नागरिकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेणाऱ्या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी सेंटरचे अभिनंदन केले.

हे आरोग्य शिबिर दि. २० जानेवारी दुपारी १२.०० वाजल्यापासून ते २६ जानेवारी २०२६ पर्यंत सलग चालू राहणार असून, परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी श्री. पियुष कोठारी, श्री.मिथेश कोठारी, श्री. अमित तुरुकमारे, श्री. गणेश वाघमारे, श्री. बापू वाघमारे,संकेत कांबळे,प्रांजल माने,सागर इंगळे, वैष्णवी कदम,आरती शिंदे,पूजा खेमसे, कर्मचारीवर्ग तसेच नागरिक आदी उपस्थित होते.

You may have missed