Hasan Mushrif On Uddhav Thackeray | विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही – मंत्री हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर : Hasan Mushrif On Uddhav Thackeray | विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election Maharashtra 2024) जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे म्हणणे उद्धव ठाकरे यांनी ऐकलेले दिसत नाही, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात योजनेच्या आढावा बैठकीसाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हसन मुश्रीफ म्हणाले, महायुतीचे विधान परिषदेचे सर्व उमेदवार विजयी होणार असून पवार किंवा ठाकरे गटाचा एक उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वबळाची तयारी करत असतात. विनय कोरे यांना किती जागा सोडायच्या याचा निर्णय वरिष्ठ घेतली.

विशाळगड अतिक्रमणबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, विशाळगड येथील अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद सुरु आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही मर्यादा आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्याला भेटण्यासाठी आले तर त्यांची समजूत काढेन.

दोषींवर कारवाई करावी

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरून घेणे, आदी प्रक्रियेत पैशांची मागणी होणार नाही, याची दक्षता घ्या. महिलांची अडवणूक, दिरंगाई करून पैसे घेतल्याचे आढळल्यास दोषींवर पोलिस कारवाई करावी. दलालांचा सुळसुळाट होऊ देऊ नका, असे निर्देश आज हसन मुश्रीफ यांनी येथे दिले. योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात अग्रेसर राहिल यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Leopard Dive Ghat Pune | पुणे : दिवे घाटात भररस्त्यात प्रवाशांना बिबट्याचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल (Video)

Ravet Pune Crime News | पिंपरी: जागेच्या व्यवहारात महिलेची फसवणूक, डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

You may have missed