HDFC Bank Credit Card Rules | एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका! 1 ऑगस्टपासून बदलतील अनेक नियम, महागणार क्रेडिट कार्डचा वापर
नवी दिल्ली – HDFC Bank Credit Card Rules | जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. एचडीएफसी बँक 1 ऑगस्टपासून आपल्या अनेक नियमात बदल करत आहे, ज्याचा थेट परिणाम क्रेडिट कार्ड यूजर्सवर होणार आहे. या कारणामुळे एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डचा वापर महागात पडणार आहे.
थर्ड पार्टी अॅप्सद्वारे रेंट भरणे महागणार
क्रेड, पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज सारख्या थर्ड-पार्टी पेमेंट अॅप्सद्वारे केल्या जाणार्या सर्व रेंटल ट्रांजक्शनवर 1 टक्का चार्ज वसूल केला जाणार आहे. या चार्जचे कॅपिंग 3,000 रुपये प्रति ट्रांजक्शन असेल. हा नियम 1 ऑगस्टपासून लागू होईल.
एज्युकेशनल ट्रांजक्शनवर एक्सट्रा चार्ज
एज्युकेशनल ट्रांजक्शनसाठी थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून पेमेंट केले तर चार्ज वाढवून 1% केला आहे. मात्र, कॉलेज अथवा शाळेच्या वेबसाईट अथवा त्यांच्या पीओएस मशीनद्वारे ट्रांजक्शन आणि इंटरनॅशनल एज्युकेशनल पेमेंटवर कोणत्याही प्रकारचा चार्ज द्यावा लागणार नाही.
फ्यूएल ट्रांजक्शन होणार महाग
जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे 15 हजार रुपयांपेक्षा कमी फ्यूएल पेमेंट करत असाल तर एक्सट्रा चार्ज लागणार नाही. मात्र, एकाचवेळी 15 हजार रुपयांपेक्षा जास्त फ्यूएल पेमेंट केले तर 1 टक्का जादा चार्ज द्यावा लागेल. ज्याची कमाल मर्यादा 3 हजार रुपये आहे.
युटीलीटी पेमेंट महागणार
जर तुम्ही युटीलीटी बिल भरण्यासाठी एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर 50 हजार रुपयांपेक्षा कमीच्या ट्रांजक्शनवर कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. मात्र यापेक्षा जास्त पेमेंटवर 1 टक्का प्रति पेमेंट चार्ज भरावा लागेल, ज्याची 3 हजार रुपये प्रति ट्रांजक्शन कमाल मर्यादा आहे. (HDFC Bank Credit Card Rules)
लेट पेमेंट चार्जमध्ये बदल
आऊटस्टँडिंग रक्कमेच्या आधारावर लेट पेमेंट स्ट्रक्चर बदलण्यात आले आहे, ज्याची रेंज 100 रुपयापासून 300 रुपयापर्यंत असेल.
टाटा न्यू कार्डमध्ये बदल
टाटा न्यू इनफिनिटी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि टाटा न्यू प्लस एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड
या दोन्ही कार्डद्वारे करण्यात येणार्या यूपीआय पेमेंटवर मिळणार्या कॅशबॅक स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल होणार आहे.
हे बदल सुद्धा 1 ऑगस्ट 2024 पासून लागू होतील.
आता हे कार्ड टाटा न्यू अॅपला लिंक करून यूपीआय पेमेंट केल्यास जास्त फायदा होईल.
जर टाटा न्यू ऐवजी इतर यूपीआय अॅप्सला हे कार्ड लिंक करून यूपीआय पेमेंट केल्यास कमी फायदा मिळेल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश