Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

पुणे: Helmet Compulsory In Pune | विधान भवन येथे आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नयेत यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करावे, तसेच प्रशासनाने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करावी, असे निर्देश अभय सप्रे यांनी दिले आहेत.

अभय सप्रे म्हणाले, ” रस्ते अपघातात दुचाकी वाहन चालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनचालकाने स्वत: आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करावा. त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती करावी. वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करावे”, असे म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले, ” रस्ते अपघातात बळींची संख्या लक्षात घेता परिवहन विभाग, पोलीस विभाग तसेच सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी सकारात्मकतेने काम करावे. अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक बजावण्याबरोबरच निस्वार्थ भावनेने काम करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन रस्ता सुरक्षेसंबधी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करावी. अपघातातील बळींची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न करावे. या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे सर्व संबधित यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक पालन करावे.”

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Harshvardhan Patil | शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी;
पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील राज्य पातळीवर सक्रिय होणार

Daron Acemoglu News | अभिमानास्पद ! नोबेल पारितोषिक विजेत्याने ‘पुणे न्यूज’ची बातमी
शेअर करुन आपल्याला पारितोषिकाने सन्मानित केल्याची केली घोषणा