Hinjewadi Pune Crime News | प्रेमसंबंध असतानाही लग्नास नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; तरुणासह दोघांना अटक
पिंपरी : Hinjewadi Pune Crime News | काही वर्षांच्या प्रेमसंबंधानंतरही लग्नास नकार दिल्याने १९ वर्षाच्या तरुणीने ओढणीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे (Suicide Case). याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) तरुणासह दोघांना अटक केली आहे.
सुबोध सुधीर साखरे Subodh Sudhir Sakhare (वय २५, रा. साखरे वस्ती, हिंजवडी, ता. मुळशी) आणि रोहन सुदाम पारखी Rohan Sudam Parkhi (वय ३०, रा. मुलानी वस्ती, मान, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर, सुधीर साखरे, सुबोध साखरे याची आई आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कैलास मुरलीधर गायकवाड (वय ४०, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना फिर्यादीच्या राहते घरी शनिवारी दुपारी ४ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १९ वर्षाच्या मुलीचे सुबोध साखरे याच्याबरोबर मागील काही वर्षांपासून प्रेम संबंध होते.
फिर्यादीच्या मुलीने त्यास लग्न कर असा तगादा लावला होता.
परंतु सुबोध व त्याच्या नातेवाईकांनी लग्नास नकार देऊन काहीही झाले तरी लग्न लावून देणार नाही, असे बोलले.
त्यामुळे फिर्यादींची मुलगी डिप्रेशनमध्ये आली.
तिने मानसिक दडपणाखाली राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक झोल तपास करीत आहेत. (Hinjewadi Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक