Hinjewadi Pune Crime News | कामाचे पैसे साथीदाराला दिल्याने महिलेचे अश्लिल फोटो केले व्हायरल
पिंपरी : Hinjewadi Pune Crime News | किचन ट्रॉलीचे काम दुसर्या कामगाराने पूर्ण केल्याने उरलेले पैसे महिलेने त्याच्या साथीदाराला दिले. त्याच्या रागातून कामगाराने महिलेचे अश्लिल फोटो (Indecent Photo) तयार करुन बनावट अकाऊंटवर व्हायरल केले.
याबाबत ३४ वर्षाच्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हनुमान सियाक या कामगाराविरुद्ध गुन्हा दखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या प्लॅटमधील किचन ट्रॉलीचे कामाचे ४२ हजार रुपये त्यांनी हनुमान व कैलास यांना पाठविले. तसेच काम पूर्ण न झाल्याने उर्वरित ६ हजार रुपये त्यांनी दिले नव्हते. राहिलेले काम कैलास याने केल्याने ते पैसे कैलास देण्यास फिर्यादी तयार होते़, परंतु, हनुमान याने हे ६ हजार रुपये मलाच पाठवायचे असे म्हणाला. त्यानंतर त्याने फिर्यादीचे पतीचे मोबाईलवर तसेच फिर्यादीचे मोबाईलचे व्हॉटसअॅप प्रोफाईलवर फिर्यादीचा फोटो ठेवून त्याखाली फुल सर्व्हिस ५००० पर नाईट असा मजकूर लिहला. (Hinjewadi Pune Crime News)
तसेच फिर्यादीचे नावे फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्यावर कॉल गर्ल अवेलेबल असा अश्लिल मजकूर लिहला. त्याचे स्क्रीन शॉट फिर्यादीचे पतीचे मोबाईलवर पाठविला. तसेच त्यांच्या सोसायटीतील लोकांना पाठवून फिर्यादीची बदनामी केली.
फिर्यादीचे पती यांना फोन, व्हॉटसअॅप मेसेज, व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करुन पैसे पाठवून द्या नाही
तर नग्न स्थितीतील बाईला फिर्यादीचा चेहरा लावून तो व्हायरल करीत, अशी धमकी दिली.
हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अधिक तपासासाठी मुंढवा पोलिसांकडे हस्तांतरीत केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी