Hinjewadi Pune Crime News | जेलमधून सुटून आलेल्या मामेभावाला भेटायला जाणाऱ्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Hinjewadi Pune Crime News | जेलमधून सुटून आलेला मामेभाऊ त्याची तब्येत बरी नसल्याने त्याला भेटायला तरुण जात होता. वाटेत टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). जखमी अवस्थेत तो पळून जात असताना पाठीमागून गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Hinjewadi Pune Crime News)
याबाबत विशाल प्रकाश देवकर (वय ३०, रा. घोटावडे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्षय साधु कापसे (वय २९) मनोहर साधु कापसे (वय ३५), साधु कापसे (रा. हिंजवडी) अमोल सुदाम धुमाळ, निलेश सुदाम धुमाळ (रा. धुमाळवाडी) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हिंजवडी येथील गवारवाडी मधील बापुजी बुवा मंदिराजवळ फेज ३ येथे ८ सप्टेबर रोजी रात्री ९ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मामे भाऊ तुरुंगातून सुटला होता. तो आजारी असल्याने फिर्यादी त्याला भेटण्याकरीता मोटारसायकलवरुन जात होते. त्यावेळी वाटेत विठ्ठल मंदिराजवळ निलेश धुमाळ यांनी हात करुन थांबवले. अमोल धुमाळ, मनोहर धुमाळ यांनी फिर्यादीस पकडले.
साधु कापसे याने फिर्यादीचे थोबाडीत मारली. अक्षय कापसे व साधु कापसे
यांनी समोर थांबून फिर्यादी यांचा रस्ता अडविल्याने फिर्यादी यांना सर्वांना ढकलून दिले. त्यांनी पाहिले अक्षय कापसे, मनोहर कापसे, अमोल धुमाळ यांच्या हातात कोयते होते. ते पाहून त्यांनी जीव वाचविण्यासाठी जंगलाचे दिशेने पळ काढला. तेव्हा कोणीतरी मारुन फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केला. फिर्यादी घाबरुन जंगलात पळून गेले. तेव्हा त्यांना मोठ्या फटाक्याचा आवाज आला. त्यांच्यावर गोळीबार केल्याचा त्यांना संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक झोल (PSI Zol) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा