Hinjewadi Pune Crime News | दिल्लीहून गणपती पहायला आला आणि चोरी करुन गेला; खरेदी करताना पासवर्ड पाहून बँकेचे खाते केले रिकामे

पिंपरी : Hinjewadi Pune Crime News | मित्राबरोबर जुजबी ओळख झालेल्या दिल्लीतील तरुणाला गणपती पाहण्यासाठी घरी आश्रय दिला. तोच घरात चोरी करुन पसार झाला. खरेदी करताना त्याने पासवर्ड पाहून ठेवल्याने मोबाईल चोरुन त्याद्वारे बँक खाते रिकामे केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत बृहदीश हरिषकुमार (वय २७, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिपककुमार राकेशकुमार (वय २८, रा. वसंतकुंज, दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेफ म्हणून काम करतात. तसेच वेगवेगळ्या हॉटेल्स व कॉलेजमध्ये लेक्चर देत असतात. ते एक महिन्यांपूर्वी दिल्ली येथे जपानचे अॅम्बेसिडर यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी दिल्लीमधील छत्रपूर येथील मित्र साकेत याला भेटायला गेले. तेथे त्यांची ओळख दीपक कपूर नावाच्या मुलाशी भेट झाली. त्याने फिर्यादी यांना गणपती मिरवणुक पहायची आहे, तसेच उकडीचे मोदक खायचे आहेत, असे सांगितले. त्यांना गणेशोत्सवात तुझ्याकडे येतो, असे फिर्यादीला सांगितले. त्याप्रमाणे २ सप्टेबर रोजी तो पुण्यात आला. त्याला एअरपोर्टवरुन घेऊन येऊन बावधन येथील घरी ठेवले. चार दिवस पुण्यात फिरवले. त्यादरम्यान फिर्यादीने बरीच खरेदी केली.
त्यावेळी दीपककुमार याने फिर्यादीचे पासवर्ड पाहून ठेवले. ५ सप्टेबर रोजी रात्री ८ वाजता त्यांनी जेवण केल्यावर दीपककुमार याने रात्री १२ वाजता माझी फ्लाईट असल्याचे सांगून फिर्यादी यांना फ्रेश होऊन येण्याचा आग्रह केला. ते बाथरुममध्ये जाताच तो बाहेर गेला. दरवाजाचा आवाज झाल्याने ते बाहेर आले, तेव्हा दीपककुमार हा लिफ्टसमोर उभा होता. कॅब आली म्हणत फिर्यादीला खाली बोलावले. फिर्यादी घराची, गाडीची चावी, फोन घेण्यासाठी परत घरात आले. तर त्या त्यांना सापडल्या नाहीत. त्या शोधण्यात त्यांची १० मिनिटे गेली. त्याचवेळी त्यांच्या फोन च्या ब्ल्यु टुथला जोडलेल्या साऊंडमधून युवर फोन इज डिस्कनेक्टेड असा आवाज आला. त्यामुळे दीपककुमार याने फोन व चावी घेऊन गेल्याचा संशय आला. ते खाली आले. तेव्हा वॉचमनने दीपककुमार घाईघाईत रिक्षात बसून गेल्याचे सांगितले.
त्यांना संशय आल्याने त्यांनी घरात येऊन कपाटात पाहिले तर त्यातील ५० हजार ५०० रुपये जागेवर नव्हते.
त्यांनी लॅपटॉप घेऊन ईमेल चेक केले. त्यात बँकेचा ट्रानक्शन लिमिट वाढविल्याबाबत आणि मोबाईल डिसेबल केल्याबाबतचे दोन ई मेल होते.
त्यांनी खाली जाऊन वॉचमनचा मोबाईल घेऊन त्यावरुन बँक डेबीट खाते फ्रिज करण्यासाठी कस्टमर केअरला फोन केला.
तोपर्यंत दीपककुमार याने १ लाख रुपये काढून घेतले होते.
अशा प्रकारे गणपती उत्सव पाहण्यासाठी आश्रय दिलेल्या जुजबी ओळख असलेल्या चोरट्याने तरुणाचा आय फोन,
गाडीची चावी, घराची चावी, कपाटात ठेवलेले ५० हजार ५०० रुपये, बँकेतील १ लाख रुपये असा १ लाख ८० हजार ५०० रुपयांना गंडा घालून पळून गेला.
फसवणुक झाल्यानंतरही तब्बल १० दिवसांनी फिर्याद दाखल झाली असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल (PSI Dnyaneshwar Zol) तपास करीत आहेत. (Hinjewadi Pune Crime News)
गणपती उत्सव Video –
https://www.instagram.com/p/DAAYeqjpgss
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा