Hinjewadi Pune Crime News | जमीन दे नाही तर २ कोटी दे, खंडणी मागून मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल

Hinjewadi-Police

पिंपरी : Hinjewadi Pune Crime News | तू एक तर नेरे दत्तवाडी (Nere Dattawadi) येथे विकत घेतलेली जमीन दे नाही तर आम्हाला २ कोटी रुपये दे असे बोलून चौघा जणांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. गळ्यातील एक लाख रुपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून (Robbery Case) नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Hinjewadi Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAiC29Ri7tR

याप्रकरणी प्रवीण वाल्मीक भोंडवे (वय ४५, रा. भोंडवे प्लाझा, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप बबन भिंतोड (रा. कासारसाई, ता. मुळशी), ज्ञानेश्वर निवृत्ती काळभोर (रा. आकुर्डी गाव), भुषण प्रभाकर बोडके (रा. रिहे गाव, ता. मुळशी) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फिर्यादी यांच्या घरी २ जुलै २०२३ रोजी घडला होता़ त्याची आता फिर्याद देण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DAiBoFHJDkq

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरात असताना चौघे जण दुपारी घरात शिरले. त्यांनी फिर्यादी यांना तू एक तर नेरे दत्तवाडी येथे विकत घेतलेली जमीन दे, नाही तर आम्हाला दोन कोटी रुपये दे, असे बोलून शिवीगाळ करुन मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. फिर्यादी हे तक्रार देण्यासाठी जात असताना तू कसा काय आमच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो तेच बघतो, असे बोलून फिर्यादी यांची अडवणूक केली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन फिर्याद दिली नव्हती. सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAiAbV7CJle

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)

You may have missed