Hinjewadi Pune Crime News | पिंपरी: गुन्ह्यातून सोडवण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, हिंजवडी परिसरातील घटना
पिंपरी : Hinjewadi Pune Crime News | वेश्या व्यवसायाच्या गुन्ह्यातून (Prostitution Case) बाहेर काढण्याचे आश्वासन देऊन लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर लग्नाबाबत विचारणा केली असता जातीवाचक शिवीगाळ करुन लग्नास नकार दिला. याप्रकरणी एका व्यक्तीवर हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) बलात्कार (Rape Case) व अॅट्रॉसिटीचा गुन्हा (Atrocity Act) दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2019 ते मे 2024 या कालावधीत वाकड (Wakad) परिसरात घडला आहे.
याबाबत कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार विशाल पवनकुमार अगरवाल
Vishal Pawankumar Agarwal (वय-40 रा. अगरवाल बिल्डींग, मोहननगर, पिंपरी) याच्या विरुद्ध आयपीसी 376, 376/2/एन, 504, 506 सह अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या पतीपासून विभक्त राहतात. आरोपीचे वाकड परिसरात स्पा स्टेंटर आहे. महिलेला कामाची गरज असल्याने त्या आरोपीच्या स्पा सेंटरमध्ये रिसेप्शनिस्ट चे काम करत होत्या. दरम्यान पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये छापा टाकून मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात पीडित महिलेला तुरुंगात जावे लागले होते. आरोपी देखील तुरुंगात होता.
पिडित महिला व आरोपी जामिनीवर बाहेर आल्यानंतर आरोपीने महिलेची भेट घेतली.
वेश्या व्यवसायाच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले.
तसेच महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
महिलेने विशाल अगरवाल याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली.
फिर्य़ादी यांनी लग्नाबाबत तगादा लावला असता अगरवाल याने महिलेला फोन करुन जातीवाचक शिवीगाळ करुन लग्नास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत