Hinjewadi Pune Crime News | पुणे : 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय तरुणाने केला बलात्कार; गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

Hinjewadi Police

पुणे / पिंपरी : Hinjewadi Pune Crime News | सोसायटीच्या आवारात शतपावली करत असलेल्या ८५ वर्षाच्या वृद्धेचे तोंड दाबून तिला सर्व्हिस लिफ्टने वरच्या मजल्यावर नेले. तेथील ६ व ७ मजल्याच्या जीन्यामध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे घृणास्पद कृत्य करताना नराधमाने तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) या नराधमाला अटक केली आहे. (Old Woman Rape Case)

https://www.instagram.com/p/DAVgdsDp4oI

ओम जयचंद पुरी Om Jaychand Puri (वय २३, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) असे या नराधमाचे नाव आहे. ही घटना म्हाळुंगेमधील एका सोसायटीत २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते सव्वासात वाजेच्या दरम्यान घडली.

https://www.instagram.com/p/DAVdlnQJh-k

याबाबत एका ५७ वर्षाच्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई या सोसायटीच्या समोरील मोकळ्या जागेत सायंकाळी शतपावली करत होत्या. आरोपी हा इलेक्ट्रीशन आहे. तो सोसायटीत इलेक्ट्रीशनच्या कामासाठी येत असतो. त्याने वृद्धेला पाठीमागून तोंड दाबून सर्व्हिस लिफ्टने वरच्या मजल्यावर नेले. तेथून जिन्यातून ओढत फरफटत ६ व ७ मजल्याचे जीन्यामध्ये असलेल्या जागेमध्ये वृद्धेवर बलात्कार केला. हे कृत्य करत असताना त्याने तिचा गळा दाबुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी तेथील सीसीटीव्हीची तपासणी करुन या नराधमाला मंगळवारी दुपारी पकडले.

https://www.instagram.com/p/DAVSil4J4At

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी कात्रज आणि इतर परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”

You may have missed