Human Rights Commission | पोलिसांच्या धमकीमुळे तरुणाची आत्महत्या, आईला 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे मानवाधिकार आयोगाचे पोलिसांना आदेश

Virar Police-Youth Suicide Case

मुंबई : Human Rights Commission | विरार पोलिसांनी (Virar Police) केलेल्या दमदाटीमुळे तरुणाने आत्महत्या केली होती (Suicide Case). अभय पालशेतकर (वय-28) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अभय याच्या आईला 10 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. 21 एप्रिल रोजी अभयने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ तयार करुन पोलिसांनी धमकी दिल्याचे सांगितले होते.

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथे अभय हा त्याची पत्नी आरोही पालशेतकर (वय-25) हिच्यासोबत राहत होता. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद होते. 21 एप्रिल रोजी त्याच्या पत्नीने अभय विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी अभयला बोलवून 149 अंतर्गत नोटीस देऊन समज दिली होती. घरी आल्यानंतर त्याने घरातील हॉलच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार करुन नातेवाईकांना पाठवला.

सुनील पवार नावाच्या पोलिसाने टायरमध्ये घालून मारण्याची धमकी दिल्याने मी आत्महत्या करत असल्याचे व्हिडीओत सांगितले होते. मात्र, विरार पोलिसांनी केवळ अभयच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला. तर संबंधित पोलिसाची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पोलिसाला सोयीस्कररित्या वाचवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे माध्यमात आलेल्या बातम्यांच्या आधारे राज्याच्या मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली. आयोगाने पोलीस आयुक्तांना याबाबत नोटीस पाठवून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते.

सुनावणीनंतर आयोगाने पोलिसांच्या कृतीला दोषी ठरवले.
पोलिसांनी केलेल्या दमदाटी आणि धमकी हे मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे आहे.
याप्रकरणी मयत अभय याची आई उज्वला पालशेकर यांना सहा आठवड्याच्या आत 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
जर या कालावधीत नुकसान भरपाई दिली नाही तर 8 टक्के व्याज दराने ती द्यावी लागेल, असेही आदेशात नमूद केले आहे.
एम.ए.सईद आणि के.के. तातेड यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

याशिवाय पोलिसांनी नागरिकांशी कसे वागावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दर तीन महिन्यात कार्यशाळा आयोजित करण्याचे आदेशही राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
मागील आठवड्यातच आयोगाने चावी विक्रेता महमद अली अहमद अली अन्सारी (वय-35)
याला मणिकपूर पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी तीन लाखांचा दंड ठोठावला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल