Husband Kill Wife In TN | बॉन्डेज सेक्स करीत असताना पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा; पोस्टमार्टम रिपोर्टमुळे जिम ट्रेनर पतीचं बिंग फुटलं

तमिळनाडू: Husband Kill Wife In TN | बॉन्डेज सेक्स करीत असताना पत्नीचा मृत्यू झाल्याचे पतीने पोलिसांना सांगितले होते. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमुळे पतीचा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली भास्कर (वय-३४) या आरोपी पतीला तमिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातूनअटक करण्यात आली आहे. भास्कर हा जिम ट्रेनर असून तो ४ जिम चालवतो. पत्नी शशिकला देखील महिलांसाठी जिम चालवायची. या जोडप्याला ४ आणि २ वर्षांची मुले देखील आहेत. अटक केली
अधिक माहितीनुसार, बंगळुरुत प्ले स्कूल चालवत असताना शशिकला भास्करच्या प्रेमात पडली होती. भास्कर आणि शशिकला यांचा २०१८ साली प्रेमविवाह झाला. भास्करचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय शशिकलाला होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. ३० एप्रिलला भास्करने शशिकलाला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. शशिकलाच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरु झाला आणि शरीरसंबंधावेळी ती बेशुद्ध पडली, अशी माहिती भास्करने डॉक्टरांना दिली होती. डॉक्टरांनी शशिकलाला मृत घोषित केले. रुग्णालयाने याबद्दलची माहिती सिपटोक पोलिसांना देण्यात दिली.
तपासादरम्यान पोलिसांना शशिकलाच्या गळ्याजवळ खुणा दिसल्या. शशिकलाचा मृत्यू गळा दाबल्याने झाला असावा असा संशय त्यांना आल्याने शशिकलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांना भास्करबद्दल शंका आल्याने त्यांनी चौकशी सुरु केली. शशिकला दारु प्यायली होती. त्यानंतर आम्ही बॉन्डेज सेक्स केला. त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याचे भास्करने पोलिसांना सांगितले. पण शवविच्छेदन अहवालाने भास्करचे बिंग फुटले. शशिकलाचा मृत्यू हा पूर्वनियोजित खून असल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी भास्करला अटक केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.