IAS Dr Pooja Khedkar | ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट, अधिकाऱ्याचे अँटी चेंबरही बळकावले; पुण्यातील IAS पूजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी
पुणे : IAS Dr Pooja Khedkar | पुण्यातील प्रोबेशनरी सनदी अधिकारी पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहेत. नव्यानेच प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या पूजा खेडकर यांच्या बड्या अधिकाऱ्यांनाही लाजवतील अशा मागण्या आणि ‘कारनामे’ अलीकडच्या काळात चर्चेचा विषय ठरत होते. या सगळ्या वादानंतर आता पूजा खेडकर यांची पुण्यातून उचलबांगडी करुन त्यांची बदली थेट वाशिमला करण्यात आली आहे. त्या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असणार आहेत.
पूजा खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्ती झाल्यापासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले. स्वत:च्या खासगी गाडीवर लाल दिवा लावला. वरिष्ठांनी त्यांना समजावून सांगितले, मात्र त्यांच्या वर्तवणुकीत कोणताच बदल झाला नाही. अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांना पत्र लिहून पूजा यांच्याबाबत तक्रार केली. त्यानंतर पूजा यांची बदली करण्यात आली.
खेडकर 3 जून रोजी पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रजू झाल्या. मात्र, रुजू होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे निरोप देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, गाडी, निवासस्थान व शिपाई याबाबत वारंवार मागणी केली. प्रत्यक्षात कोणत्याही आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना दोन वर्षांचा प्रोबेशन काळ पूर्ण करावा लागतो. त्याकाळात त्यांना विविध विभागात काम करावे लागते. या सर्व कामाचा अनुभव आल्यानंतरच प्रत्यक्षात त्यांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, पूजा खेडकर यांनी प्रोबेशन काळातच जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्या करण्यास सुरु केले.
पूजा खेडकर यांचा प्रोबेशन पिरीयडवर असतानाही अधिकारी असल्याच्या थाटात राहायच्या. नियमानुसार खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावणे अयोग्य आहे. पण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या IAS डॉ. पूजा खेडकर यांनी VIP नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावून घेतला. तसेच या गाडीला लाल आणि निळा दिवा पण लावून घेतला होता. ऑडी कंपनीच्या अलिशान गाडीला लोगो आणि दिवा लावून कार्यालयात येणारे हे मोठे अधिकारी कोण याची चर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात होत होती. विशेष म्हणजे या अधिकारी मॅडम त्यांच्या या गाडीचे दिवे दिवसासुद्धा चालू ठेवायचे.
कोण आहेत पूजा खेडकर?
पूजा खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील त्या रहिवाशी आहेत.
माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या आहेत.
दिलीप खेडकर हे प्रदूषम विभागाचे आयुक्त राहिले आहेत.
तर त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे देखील आयएएस अधिकारी होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?