IAS Puja Dilip Khedkar | पूजा खेडकरचे वडील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित; आणखी धक्कादायक खुलासे समोर
पुणे : IAS Puja Dilip Khedkar | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर चर्चेत आहेत. आता त्यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांना दोन वेळा निलंबित केल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप खेडकर यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित करण्यात आले होते, असं वृत्त माध्यमांनी दिले आहे.
दिलीप खेडकर आणि त्यांची पत्नी मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्यावर काही लोकांना बंदूक दाखवून धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलीप खेडकर फरार झाले आहेत. तर, मनोरमा खेडकर यांना आज अटक करण्यात आली. त्यांची मालमत्ता त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याच्या तक्रारीनंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB) त्यांची चौकशीही सुरू केली आहे.
दिलीप खेडकर यांना २०१८ आणि २०२० मध्ये निलंबनाला सामोरे जावे लागले होते माध्यमांद्वारे ऍक्सेस केलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की २०१५ मध्ये दिलीप खेडकर यांच्या विरोधात अनेक व्यावसायिकांनी तक्रार केली होती आणि त्यांच्यावर अनावश्यक त्रास आणि खंडणीचा आरोप केला होता.
२०१८ मध्ये दिलीप खेडकर कोल्हापूर येथे प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत असताना स्थानिक सॉ मिल आणि लाकूड व्यापारी असोसिएशनने त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली, त्यांनी त्यांचा वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी २५ ते ५० हजार रुपये पर्यंत लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता.
दिलीप खेडकर हे एकावेळी सहा ते सात महिने परवानगी शिवाय गैरहजर होते,
असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
२०१९ च्या तक्रारीत दिलीप खेडकर यांनी एका कंपनीकडून २० लाखांची मागणी केल्याचा आरोप केला होता.
२०२० च्या आदेशात म्हटले आहे की दिलीप खेडकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (आचार) नियम,
१९७९ च्या नियम ३(१) आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील)
नियमांच्या नियम क्रमांक ४ मधील उपकलम १ (अ) अंतर्गत निलंबित करण्यात आले आहे.
आदेशात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारींचा हवाला देण्यात आला आणि चौकशी सुरू करण्यात आल्याचेही म्हटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…