IAS Puja Khedkar | कागदपत्रे मिळवण्यासाठी खोटा पत्ता आणि रेशनकार्डही बनवल्याचे समोर; पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा

IAS Dr Pooja Khedkar

पुणे : IAS Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी नोकरी मिळवण्यासाठी सर्व हद्द पार केलेली आहे. खोटी प्रमाणपत्रे व खोटे उत्पन्न दाखवून नोकरी मिळवलेले समोर आलेलं असताना आता त्यांनी हे सर्व खोटी कागदपत्रे मिळवण्यासाठी खोटा पत्ता आणि रेशनकार्डही बनवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बडा वरदहस्त असला आणि सरकारी यंत्रणा हाताशी असली की कशी बनावटगिरी करता येते हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

पूजा खेडकरने एकापेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्रे मिळवलेली आहेत. अंशतः दृष्टिहीन असल्याचे, गुढघ्याला ७ टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे. त्याशिवाय लाखोंमध्ये उत्पन्न असतानाही क्रिमीलेअर प्रमाणपत्र घेऊन बळकावलेली युपीएसची ची जागा ही देखील एक मोठी फसवणूक असल्याचे आरोप होत आहेत. अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा यांनी खोटा पत्ता दिला आहे. तसेच या पत्त्यावर रेशनकार्ड काढले आहे. आता हे सर्व करण्यासाठी कोणाचा वरदहस्त होता याबाबत चर्चा सुरु आहेत.

वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता देऊन आणि त्यासाठी बनावट रेशनकार्ड देऊन अपंगत्व प्रमाणपत्र बनवल्याचे समोर आले आहे. बाणेरला राहात असूनही पूजा यांनी प्लॉट नंबर ५२ , देहू-आळंदी तळवडे हा पिंपरी चिंचवड हद्दीतील पत्ता रुग्णालयाला दिला होता. मुळात हा पत्ता थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच पूजा ची आई मनोरमा खेडकर यांच्या सहकाऱ्याचा होता. याच कंपनीच्या नावावर पूजा वापरत असलेली ऑडी कार आहे. या कंपनीने महापालिकेचा जवळपास पावणेतीन लाखांचा कर थकवला आहे. (IAS Puja Khedkar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed