IAS Puja Khedkar | IAS पूजा खेडकरांच्या ड्रायव्हरने भरला ऑडी कारचा संपूर्ण दंड

IAS Dr Pooja Khedkar

पिंपरी : IAS Puja Khedkar | चर्चेत आलेल्या आयएएस पूजा खेडकर यांच्याकडे असलेल्या आलिशान कारवरील दंडाची रक्कम भरण्यात आली आहे. खासगी वाहनावर (Audi Car) महाराष्ट्र शासन लिहिणे, अंबर दिवा लावणे यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेडकर यांच्या कारवर 27 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. खेडकर यांचे प्रकरण चर्चेत आल्यानंतर त्यांच्या कार चालकाने निगडी वाहतूक विभागात (Nigdi Traffic Division) येऊन दंडाची संपूर्ण रक्कम भरली.

विविध कराणांसाठी मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आयएएस पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी ऑडी कार (एमएच 12 एआर 7000) वर पुढे व मागे महाराष्ट्र शासन असे लिहिले. तसेच करावर अंबर दिवा लावला होता. याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी या कारवर मोटार वाहन कायदा कलम 177 नुसार कारवाई केली होती.

वाहतुकीच्या निमयांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवर 27 हजार 400 रुपये दंड आकारला होता. हा दंड कार चालकाने निगडी येथे जमा केला आहे. निगडी येथील भक्की-शक्ती चौकात वाहतूक पोलीस मुद्दशीर मुशीर ठाणेदार उर्फ अस्लम ठाणेदार वाहतुकीचे नियमन करत असताना कारचालक त्याठिकाणी आला. त्याने ठाणेदार यांना त्यांच्या कारवर 27 हजार 400 रुपयांचा दंड असल्याचे सांगितले. त्यानंतर कारचालकाने दंडाची संपूर्ण रक्कम जमा केली. (IAS Puja Khedkar)

यासंदर्भात निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर बाबर म्हणाले,
निगडी मधील भक्ती-शक्ती चौकात वाहतुकीचे नियमन करत असताना खेडकर
यांच्या चालकाने निगडी वाहतूक विभागातील पोलीस अंमलदाराकडे दंडाची संपूर्ण रक्कम जमा केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार