IAS Puja Khedkar | IAS पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांकडून पुन्हा समन्स
पुणे : IAS Puja Khedkar | वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Pune Collector Dr Suhad Diwase) यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशिम पोलिसांकडे (Washim Police) दाखल केली होती. त्यानंतर ही तक्रार पुणे पोलिसांकडे (Pune Police) वर्ग करण्यात आली आहे. पुणे पोलीस कायदेशीर बाबी तपासत असून या प्रकरणात पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना पुण्यात येऊन जबाब नोंदवावा असे समन्स बजावले होते. मात्र, खेडकर पुण्यात जबाब नोंदविण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांना पुन्हा समन्स बजाविण्यात आले आहे. (Pune Police Summons To Puja Khedkar)
पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थीं म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला छळ केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी आपल्या तक्रारीत वाशिम पोलिसांकडे केला. खेडकर यांनी नोंदविलेल्या जबाबात हा आरोप पुण्यातील असल्याने वाशिम पोलिसांनी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग केले होते. यासाठी वाशिम पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले.
आता याबाबतची चौकशी पुणे पोलीस करणार आहेत. याप्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. खेडकर यांनी पुण्यात येऊन पोलिसांकडे जबाब नोंदवावा, असे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र, खेडकर समन्स बजाविल्यानंतर उपस्थित न राहिल्याने त्यांना पुन्हा समन्स बजाविण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहेत.
त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिममध्ये बदली करण्यात आली होती.
दरम्यान खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे,
आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्या होत्या.
तसेच बनावट कागदपत्रांच्या आरोपावरून त्यांची चौकशी सुरु आहे. (IAS Puja Khedkar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक