IAS Puja Khedkar | पूजा खेडकरची फाईल राज्य सरकारकडून केंद्राकडे सरकली; नोकरी जाण्याची शक्यता; फौजदारी कारवाईही होणार?

IAS Puja Khedkar

पुणे : IAS Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असताना आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खासगी ऑडी कारला लाल-निळा दिवा आणि ‘महाराष्ट्र सरकार’ (Maharashtra Sarkar) असा बोर्ड गाडीवर लावला होता. याशिवाय सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर देण्यात यावे, तसेच सरकारी कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी असावेत, अशी मागणी केली होती. यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात (Washim) बदली करण्यात आली. आता त्यांचे प्रशिक्षण थांबवण्याबाबत आदेश करण्यात आले आहेत.

दरम्यान आता या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गराडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने एक आठवडा तपास करून पूजा खेडकर यांची फाईल दिल्लीत पाठविली आहे. केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागासोबतच केंद्र सरकारने स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीकडे हा अहवाल पाठविण्यात आला आहे. या समितीचा पुढील पंधरा दिवसात अहवाल अपेक्षित आहे. यानंतर खेडकर दोषी आढळल्या तर त्यांच्यावर नोकरीतून काढून टाकण्याची कारवाई होऊ शकते. (IAS Puja Khedkar)

महाराष्ट्र सरकारने महसूल, आरोग्य, पोलीस आदी विविध विभागांकडून केलेल्या चौकशीतून जी कागदपत्रे सापडली,
जे काही निष्पन्न झाले ते या फाईलमध्ये जोडले आहे.
याचबरोबर तथ्य लपवणे आणि खोटी माहिती दिल्याबद्दल व वागणुकीवरून फौजदारी कारवाईही होऊ शकते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed