IAS Puja Khedkar | पूजा खेडकरने UPSC चे अटेम्प्ट संपल्यानंतरही दोनवेळा दिली परीक्षा; धक्कादायक माहिती समोर
पुणे : IAS Puja Khedkar | परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्याने त्या चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांच्या असाधारण मागण्यांमुळे त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे.
पूजा खेडकर यांचे पाय खोलात जात असल्याचं चित्र आहे. कारण, पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली आहे. शिवाय पीएमओ ने पूजा खेडकर यांचा अहवाल देखील मागवल्याची माहिती आहे. याप्रकरणी तपास सुरु असून काही अनियमितता आढळून आल्यास पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
खेडकर यांनी नगरच्या सरकारी जिल्हा रुग्णालयातून अपंगत्वाचे सर्टिफिकेट घेतले आहे. बहुनेत्र दोष आणि मानसिक आजार याबाबत त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले होते. याचा फायदा घेऊन त्यांनी बहुविकलांगता कोट्यातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे त्यांचे हे सर्टिफिकेट देखील वादाच्या भोवऱ्यात आहे. याप्रकरणी तपास केला जात असल्याची माहिती आहे. (UPSC Exam)
प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. UPSC चे सर्व अटेम्प्ट संपल्यानंतर पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे. यासंदर्भातील वृत्त माध्यांनी दिलं आहे. (IAS Puja Khedkar)
मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर पूजा दिलीपराव या नावाने त्यांनी २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली.
त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी आपल्या नावात बदल केला आणि परीक्षा दिली आहे.
त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव बदलून प्रयत्न संपल्यानंतरही दोनवेळा परीक्षा दिली आहे.
सर्वसामान्यपणे पूजा खेडकर यांना ओबीसी कोट्यातून ९ वेळा परीक्षा देता येत होती.
पण, त्यांनी नावात बदल करून तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे.
नव्या खुलाशामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
याशिवाय यूपीएससी परीक्षेबाबत अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत.
परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही धक्क्याची बाब आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार