IAS Puja Khedkar | पूजा खेडकर 2020 साली 30 वर्षाच्या तर 2023 मध्ये 31; पूजा खेडकरांचा वयातही बनाव

IAS Puja Khedkar

पुणे : IAS Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खासगी ऑडी कारला लाल-निळा दिवा आणि ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्ड गाडीवर लावला होता. याशिवाय सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर देण्यात यावे, तसेच सरकारी कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी असावेत, अशी मागणी केली होती. यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम (Washim) जिल्ह्यात बदली करण्यात आली. तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी पूजाने अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर केले असल्याचा आरोप केला.

खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी यूपीएससीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate Khedkar) दिले आहे. त्या कोट्यातून त्यांना नोकरीही मिळाली,, परंतु वैद्यकीय प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिलेले नाही. मग यूपीएससीच्या वेळीच त्यांना अपंगत्व आले होते का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खेडकर यांनी नगरच्या सरकारी जिल्हा रुग्णालयातून अपंगत्वाचे सर्टिफिकेट घेतले आहे. बहुनेत्र दोष आणि मानसिक आजार याबाबत त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले होते. याचा फायदा घेऊन त्यांनी बहुविकलांगता कोट्यातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे त्यांचे हे सर्टिफिकेट देखील वादाच्या भोवऱ्यात आहे. याप्रकरणी तपास केला जात आहे.

याहून धक्कादायक म्हणजे पूजा यांचे वय तीन वर्षात एका वर्षानेच वाढले आहे. पूजा यांनी २०२० मध्ये खेडकर पूजा दिलीपराव या नावाने परीक्षा देताना वय ३० वर्षे दाखवले होते. तर २०२३ मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव बदलून परीक्षा देताना वय वर्षे ३१ दाखवले होते.

पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमधून (Kashibai Navale Medical College) एमबीबीएसची पदवी घेतलेली आहे. त्यासाठी सन २००७ मध्ये त्यांनी एमबीबीएसला ओबीसीतील भटक्या जमाती-३ (एनटीसी-३) या कोट्यातून प्रवेश घेतला होता. विशेष म्हणजे, वडील आयएएस अधिकारी असताना त्यांनी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate) जोडले होते. त्यावेळी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे ज्यांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाखांच्या आत होते त्यांनाच मिळत होते. (IAS Puja Khedkar)

UPSC चे सर्व अटेम्प्ट संपल्यानंतर पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे.
पूजा खेडकर यांनी तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर पूजा दिलीपराव या नावाने त्यांनी २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली.
त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी आपल्या नावात बदल केला आणि परीक्षा दिली आहे.
त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर (Manorama Dilip Khedkar) असं नाव बदलून प्रयत्न संपल्यानंतरही दोनवेळा परीक्षा दिली आहे.
सर्वसामान्यपणे पूजा खेडकर यांना ओबीसी कोट्यातून ९ वेळा परीक्षा देता येत होती.
पण, त्यांनी नावात बदल करून तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed