IAS Puja Khedkar | पूजा खेडकरच्या वडिलांची प्राप्तिकर विभागाकडून होणार चौकशी; नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले?

Puja Dilip Khedkar

पुणे : IAS Puja Khedkar | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रावरून (Non Creamy Layer Certificate) आता त्यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांचे उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले ? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर याबाबत चौकशी होणार असल्याची माहिती आहे. (Income Tax Department)

पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून (Kashibai Navale Medical College) एनटी ३ या संवर्गातून प्रवेश मिळवला होता. त्यावेळी त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रही जोडल्याचे स्पष्ट झाले होते. वास्तविक, दिलीप खेडकर हे त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात (Maharashtra Pollution Control Board) अधिकारी होते. त्यामुळे २००७ मध्ये त्यांचे उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी कसे असेल, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

त्यानंतर पूजा खेडकर यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण झाल्यानंतर ओबीसी संवर्गातून तसेच दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) सादर करून आयएएसची श्रेणी मिळवली होती. त्यासाठी त्यांनी पुन्हा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडले होते. त्यानंतर एका वर्षातच अर्थात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. (IAS Puja Khedkar)

त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ४० कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केले होते.
त्यामुळे पूजा यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
याच अनुषंगाने आता प्राप्तिकर विभागाने दिलीप खेडकर यांनी सादर केलेल्या प्राप्तिकर परताव्यावरून त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed