IAS Puja Khedkar | पूजा खेडकर विरोधात FIR; UPSC ची मोठी कारवाई; IAS पद जाणार?
पुणे : IAS Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट ओळखपत्र सादर केल्याबाबत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच पूजा खेडकर यांचे आयएएस केडर रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
पूजा खेडकरचे दिव्यांगत्वाचे तसेच नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे. सोशल मीडियावर त्यांचा मॉक इंटरव्ह्यू व्हायरल (Puja Khedkar Mock Interview) झाला असून या व्हिडीओमध्ये त्यांनी आई-वडील विभक्त झाल्याचा दावा केला आहे; परंतु त्यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांनी लोकसभा निवडणुकीत अविभक्त कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. (IAS Puja Khedkar)
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आयएएस होते. ४० कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रात दिसते. पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गात नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र घेतले का? याची तपासणी सुरू आहे
खेडकर यांचे हे सर्व प्रताप मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीपर्यंत धडकले. खेडकर यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या अनागोंदीबाबत अकादमीनेही राज्य सरकारला याबाबत अहवाल देण्यास सांगितले होते.
यूपीएससीने (UPSC), पोलिस अधिकाऱ्यांकडे एफआयआर दाखल करून फौजदारी खटल्यासह तिच्याविरुद्ध अनेक प्रकरणात कारवाई सुरू केली आहे.
यासोबतच नागरी सेवा परीक्षा- 2022 च्या नियमांनुसार पूजा खेडकर
यांची नागरी सेवा परीक्षा- 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासाठी / भविष्यातील परीक्षांमधून काढून टाकण्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.
यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा 2022 साठी तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर
हिच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला.
या तपासणीतून हे उघड झाले आहे की तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव,
तिचे छायाचित्र/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिने ओळख बदलून फसवणूक केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक