IAS Transfers In Maharashtra | राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मनीषा आव्हाळेंना पुण्यात मोठी जबाबदारी

IAS Transfer

पुणे : IAS Transfers In Maharashtra | राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या पुण्यातील पदभारसह बदली करण्यात आल्याचे पत्रही सामान्य प्रशासन विभागाकडून प्राप्त झाले आहे.

त्यामुळे, आता लवकरच पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारतील. दरम्यान, त्यांच्यासह अभिनव गोयल, विनायक महामुनी, सतीशकुमार खडके, सौम्या चांडक, कुलदीप जंगम आणि प्रदीपकुमार डांगे यांचीही बदली करण्यात आली आहे.

शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, पुणे या रिक्त पदावर केली आहे. आपल्या जागी कुलदीप जंगम, भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जंगम, भाप्रसे यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्य मुख्य सचिव व्ही. राधा यांनी मनीषा आव्हाळे यांना पाठवले आहे.

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली खालीलप्रमाणे जाणून घ्या,

-अभिनव गोयल यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर

-विनायक महामुनी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर

-सतीशकुमार खडके यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड या पदावर

-सौम्या शर्मा चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी,स्मार्ट सिटी नागपूर या पदावर

-मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, पुणे या पदावर

  • कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर या पदावर -प्रदीप कुमार डांगे यांची नियुक्ती आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई या पदावर

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना

You may have missed