Imtiaz Jaleel On MVA | महाविकास आघाडीसोबतच्या युतीवर इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट; म्हणाले – “नेते म्हणतात तुम्हाला सोबत तर घेऊ मात्र,…”

Imtiaz Jaleel On MVA

नागपूर : Imtiaz Jaleel On MVA | आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एमआयएमला (MIM) देखील सोबत घेतल्यास आम्ही जायला तयार असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले होते. असे असतानाच इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत काही नेत्यांसोबत चर्चा देखील झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे. नागपूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, अनेक तास ही चर्चा चालली. तसेच आमची जेवढी ताकद आहे तेवढी आम्ही चर्चा करू,असेदेखील मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले. पण महाविकास आघाडीकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्याचे कारण म्हणजे स्टेजवर शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत मीदेखील बसेल असा प्रस्ताव दिल्याने महाविकास आघाडीकडून उत्तर येत नसल्याचे जलील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, मी त्यांना सांगितले की आम्ही महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी तयार आहोत. कारण आपण सर्वजण मिळून भाजपच्या ताकदीला उत्तर देऊ शकू. आम्हाला एकनाथ शिंदे यांची सत्ता नको आहे. अनेक तास याबाबत नेत्यांशी चर्चा झाली, मी त्यांना सांगितले आमची जितकी ताकद आहे, त्यानुसार आम्ही चर्चा करू. जर आमची ताकद २५ जागांची असेल तर आम्ही २५ ची चर्चा करू, ५० ची असेल तर ५० ची १० ची असेल तर १० ची तुम्ही याबाबत आधी बोला, तर त्यांनी सांगितले की आधी आम्हाला आमच्यात चर्चा करू द्या.

इतके दिवस लागले चर्चा करण्यासाठी आणखी कोणतही उत्तर आलेले नाही.
त्याच कारण म्हणजे जेव्हा स्टेज असेल त्यावर फक्त तीन खुर्च्या ठेवल्या जातील. एकावर उद्धव ठाकरे बसतील.
दुसऱ्या खुर्चीवर शरद पवार बसतील आणि तिसऱ्या खुर्चीवर नाना पटोले बसतील.
पण मी सांगितले तीन नव्हे तर चार खुर्च्या लागतील.
त्यावर त्यांनी आम्ही तुम्हाला सोबत तर घेऊ मात्र, शेजारी बसवू शकत नाही असे सांगितल्याचे जलील म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed