Income Tax Return Status | पॅन कार्डद्वारे सुद्धा जाणून घेऊ शकता इन्कम टॅक्स रिफंडचे स्टेटस, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
नवी दिल्ली : Income Tax Return Status | ज्यांनी टॅक्स रिटर्न फाईल केला आहे आणि त्यांना रिफंड मिळणार असेल तर ते रिफंडच्या प्रतीक्षेत आहेत. जरी रिफंडची रक्कम कमी असेल तरी रिफंडची रक्कम त्याच बँक खात्यात येते जे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसकडून व्हेरीफाय झाले आहे. याशिवाय पॅन कार्डवर नोंदलेले नाव आणि बँक खात्याचे नाव एक सारखे असावे.
वेगवेगळ्या स्त्रोतांवर टीडीएस, टीसीएस, अॅडव्हान्स टॅक्स इत्यादी कपात होते, त्यांचे रिफंड केले जाते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या रिफंडचे व्हेरिफिकेशन करत नाही, तोपर्यंत रिफंड तुमच्या खात्यात येत नाही. जेव्हा रिटर्नचे व्हेरिफिकेशन होते तेव्हाच रिफंड प्रक्रिया सुरू होते.
अनेकदा रिटर्न व्हेरिफिकेशन केल्यानंतर 15 ते 45 दिवसात तुमच्या खात्यात रिफंड येऊ शकतो. मात्र, हा कालावधी त्यावेळी आणखी वाढू शकतो, जेव्हा ITR-V फॉर्मसोबतच ऑफलाईन व्हेरिफिकेशन केले जाते. मात्र अनेक लोकांना टॅक्स रिटर्न व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक अथवा दोन दिवसातच रिफंड येतो.
पॅन कार्डद्वारे असे जाणून घ्या इन्कम टॅक्स रिफंडचे स्टेटस
- सर्वप्रथम अधिकृत ई-फायलिंग पोर्टल – https://eportal.incometax.gov.in वर जा.
- आता आपली सर्व माहिती नोंदवा. जसे की तुमचा पॅन कार्ड नंबर, कॅप्चा कोड इत्यादी.
- यानंतर तुम्हाला माय अकाऊंट सेक्शनवर जावे लागेल. जिथे रिफंड स्टेटस पहा.
- आता तुमच्या स्क्रीनवर रिफंडच्या स्थितीबाबत माहिती असेल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर
Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती
RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना