Indapur Assembly Constituency | ‘तालुक्याच्या जनतेची झाली तयारी हर्षवर्धनभाऊ आता तुम्ही वाजवा तुतारी’, इंदापूरात झळकले बॅनर; हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

Harshvardhan Patil

इंदापूर : Indapur Assembly Constituency | गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar NCP) गटात प्रवेश करून हाती तुतारी (Tutari) घेतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खुद्द हर्षवर्धन पाटील यांनीही मतदारसंघातील कामांबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यासंदर्भातल्या चर्चेला बळ मिळालं होतं.

इंदापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) आणि भारतीय जनता पार्टीचे नेते (BJP Leader) हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत. मात्र महायुतीत ही जागा कोणाच्या वाट्याल जाते यावर या दोघांचेही भवितव्य ठरणार आहे. २०१४ पासून इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहीले आहे.

महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील हे सध्या अपक्ष उमेदवारीची तयारी करत आहेत.

या सोबतच हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात देखील प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे. मागेच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. त्यानंतर पक्षांतराच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान शहरात ” इंदापूर तालुक्याच्या जनतेची झाली तयारी हर्षवर्धनभाऊ आता तुम्ही वाजवा तुतारी” अशा आशयाचे बॅनर लागल्याचे चित्र आहे.
महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे राहणार आहे.
त्यामुळे अजित पवार यांना अपक्ष लढणे किंवा तुतारी फुंकणे हा पर्याय आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान आता तशा आशयाचे बॅनरही ठिकठिकाणी झळकत आहेत.
त्यामुळे आता आगामी काळात हर्षवर्धन पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. (Indapur Assembly Constituency)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed