Indapur Assembly | दत्तात्रय भरणे-हर्षवधन पाटील यांच्या चढाओढीत गारटकरांची उडी, विधासभेसाठी दावेदारी, इंदापुरात बॅनर झळकल्याने अजित पवार गटात फूट?
पुणे : Indapur Assembly | विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने सर्वच इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. इंदापुरात तर महायुतीमध्ये (Mahayuti) विधानसभेच्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजपा नेते (BJP Leader) हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यात ही रस्सीखेच सुरू असताना यामध्ये अजित पवार गटाचेच (Ajit Pawar NCP) नेते प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांचेही भावी आमदार म्हणून बॅनर झळकल्याने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत. यावर बॅनरवर लक्ष नाही फिक्स आहे २०२४ प्रदीप दादा गारटकर आमदार साहेब, असा मजकूर आहे. या बॅनरवर सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर असे लिहिले आहे.
तत्पूर्वी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane ) यांचेही बॅनर लागले आहेत. त्यामुळे अजित पवार गटात फुट पडली का? असा प्रश्न विचारला जात आहे.
इंदापूरमध्ये भाजपा नेते हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि शरद पवार गटाने देखील बॅनरबाजी केली आहे. आमचं ठरत नसतं आमच फिक्स असतं, असे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या बॅनर लिहिले होते. दोनच दिवसापूर्वी भरणे यांचे हे बॅनर लागले होते.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर आमचा स्वाभिमान आमचे विमान,
आमचं आता ठरलंय, तयारी लागा, असा मजकूर आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने
महायुतीसह मविआमधील इच्छुकांनी अनेक ठिकाणी अशाप्रकारची बॅनरबाजी सुरू केल्याचे दिसत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!
Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)