Indapur Assembly News | इंदापूरात ऐन मतदानाच्या दिवशीच राष्ट्रवादीच्या दोन गटात गदारोळ, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षास मारहाण

marhan

इंदापूर: Indapur Assembly News | विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. दरम्यान काही मतदारसंघामध्ये गदारोळ झाल्याची माहिती पुढे येत आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne), अपक्ष उमेदवार प्रवीण माने (Pravin Mane) यांसह इतरही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Riot In 2 Factions)

दरम्यान आज मतदानाच्या दिवशी इंदापूरातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन मतदानाच्या दिवशी लाखेवाडी गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांना १५ ते २० जणांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या बबन रामचंद्र खाडे (वय ७१ वर्षे, रा. लाखेवाडी, ता. इंदापूर) यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.

दरम्यान आता दिलेल्या फिर्यादीवरुन प्रभाकर तुकाराम खाडे, संतोष प्रभाकर खाडे, शुक्रराज संतोष खाडे, धनराज प्रदीप खाडे (सर्व रा. लाखेवाडी, ता. इंदापूर) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी खाडे निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. लाखेवाडी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. आज (दि.२०) सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांनी लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सुरु असलेली भांडणे मिटवली. त्याचा राग मनात धरुन आरोपींपैकी संतोष खाडे याने त्यांना दगड फेकून मारला. इतरांनी लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केली. त्यामुळे त्यांना डोक्याला व तोंडाला मार लागला, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

उपरोक्त आरोपी हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जातेय. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed