Indapur News | इंदापुर : गणेश विसर्जनासाठी गेलेला तरूण नदीमध्ये बुडाला

ऑनलाइन टीम – Indapur News | गणेश विसर्जनासाठी गेलेला तरूण नदीमध्ये बुडाला. ही घटना मंगळवारी इंदापुर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर गावात घडली. प्रशासनाकडून सायंकाळी उशीरापर्यंत शोधकार्य सुरू होते.
अनिकेत विनायक कुलकर्णी (वय 16, रा. हांडुग्री, परांडा, धाराशीव) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. तो गेल्या नऊ वर्षांपासून लक्ष्मी नृसिंह वेदपाठशाळेत शिकत होता. मंगळवारी दुपारी तीन वाजता निरा नरसिंहपुर येथील नीरा नदीच्या लक्ष्मी घाटावर तो गणेश विसर्जनासाठी गेला होता.
त्यावेळी तो नदीच्या पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि होडीच्या साहाय्याने शोधकार्य सुरू करण्यात आले. सायंकाळी उशीरापर्यंत शोधकार्य सुरू होते. तोपर्यंत तो मिळून आला नव्हता. (Indapur News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा