Indapur Pune Crime News | हॉटेल मालकाने जेवण नाकारल्याने कंटेनरच घातला हॉटेलवर; पार्क केलेल्या गाड्याही उडवल्या (Video)

इंदापूर: Indapur Pune Crime News | पुणे सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway Accident) इंदापूरातील हिंगणगांव येथे रोडलगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मद्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एका कारसह हॉटेलचे प्रचंड नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. (Indapur Pune Crime News)
सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने MH 12 RN 4359 क्रमांकाचा हा कंटेनर निघाला होता. दरम्यान इंदापूरमधील पुणे-सोलापूर या महामार्गावर हिंगणगावच्या परिसरात एका हॉटेलवर एक कंटेनर चालक रात्रीच्या वेळी जेवणासाठी थांबला.
मात्र, हॉटेलच्या मालकाने हॉटेल बंद झाल्याचं कारण सांगत जेवण देण्यास नकार दिला. मात्र, याचाच राग चालकाला आला आणि संतप्त झालेल्या चालकाने रागाच्या भरामध्ये कंटेनर थेट हॉटेलमध्ये घातली. यामध्ये हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हॉटेल आणि हॉटेलच्या बाहेर पार्क करण्यात आलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संबंधित ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी